Member-only story
मोंबासा
(The story is edited by Mr. Manish and Mrs. Asawari Joshi, Pune)
“मोंबासा” हे नाव ऐकताच संपूर्ण शरीरावर रोमांच उभे राहिले .माझ्या शरीरातील 30 लक्ष पेशी जागृत झाल्याचा अनुभव आला. चैतन्य, जागृती , जिव्हाळा, प्रेम असे संमिश्रभावनांचे तरंग मनामध्ये उमटत होते. असे काय नाते असावे आपले या शहराशी? या नवीन उत्सुकतेने मन शहारले आणि या चिरंतन आणि शाश्वत वाटणाऱ्या भावनेचा अर्थ काय असावा, हा शोध चालू झाला. त्या दिवसापासून मी हे नाव ज्या ज्या वेळी ऐकतो तोच उत्साह, तोच आनंद आणि तीच चैतन्यमयी ऊर्जा यांचा अनुभव कायम आहे. ‘मोंबासा’,हे आफ्रिकेतील केनियाच्या पूर्व किनारपट्टीवरील एक शहर आहे. मी पूर्वी कधीच या शहराला भेट दिलेली नाही. मग या शहराचे नाव घेताच माझ्या अंगावर असे रोमांच का उभे राहतात? एक वेगळेच भाव विश्व माझ्या भोवती का तयार होते? याचा मी खूप विचार करतो, परंतु अजून याचे उत्तर धूसर आणि अस्पष्टच आहे.
न्यूयॉर्क सारख्या वेगवान शहरामध्ये आपले अस्तित्व टिकवणे, कामाचा दबाव व लग्नानंतर येणाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या यामध्ये ‘मोंबासाबद्दलच्या’ माझ्या भावनिक नात्याचा शोध थोडा मागे पडला.
मी माझे पदवी चे शिक्षण भारतामध्ये पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी मला अमेरिकेमध्ये येण्याची संधी मिळाली. मी पदवी उत्तर शिक्षण आणि पीएचडी ही पदवी अमेरिकेमध्ये पूर्ण केली. माझे सर्व शैक्षणिक आणि व्यावसायिक ध्येय साध्य करण्यासाठी, मी न्यूयॉर्क या शहराची निवड केली. भारतामध्ये खूप जिव्हाळ्याच्या कौटुंबिक वातावरणामध्ये मी मोठा झालो, त्यामुळे अमेरिकन जीवनशैलीशी जुळवून घेणे मला थोडे अवघड गेले . येथे मानवी नातेसंबंधांना काही वेळा…